भोपाळ : भारताच्या आघाडीच्या नेमबाजपटूमध्ये समावेश असलेल्या अंजुम मोदगिलने ६३ व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या ५० मी. थ्री पोझिशनमध्ये सलग तिस-यांदा सुवर्णपदक पटकावले. तामिळनाडूच्या एन गायत्रीने रौप्य तर हरयाणाच्या निश्छलने कांस्यपदक मिळवले.
Happy to end the year on a winning note with a total of 4 medals at the National Shooting Championship! 3 time consecutive National Champion in 50m 3 position Rifle Event 🥇 Will keep working hard until Tokyo 2020 Olympics 🇮🇳#DreamsComeTrue #hardworkpaysoff #Tokyo2020 pic.twitter.com/O7ILija8ZH
— . (@anjum_moudgil) December 25, 2019
टोकियो आॅलिंपिकचा कोटा प्राप्त केलेल्या हरियाणाच्या अभिषेक वर्मा-यशस्विनी देसवालने अंतिम फेरीत हर्षदा निठवे-अनिकेत यांच्यावर १६-१० अशी मात करत मिश्र सांघिकच्या १० मी एअर पिस्तूलमध्ये सुवर्णपदक पटकावले.
‘ज्युनियर्स मिश्र सांघिक’च्या १०. मी एअर पिस्तूलमध्ये हरयाणाच्या मनू भाकर आणि सरबज्योतसिंग यांनी सुवर्ण पटकावले. मनू भाकरचे हे सातवे सुवर्णपदक ठरले. त्यांनी पंजाबच्या खुशसीरत-अर्शदीप बांगा यांच्यावर १६-८ अशी बाजी मारली.