सांगवी – पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुरावजी घोलप महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील 50 विद्यार्थ्यांनी तीन गटामध्ये बालकल्याण संस्था औंध, औंध शासकीय रूग्णालय आणि दापोडी रेल्वे स्टेशन या ठिकाणी जाऊन तेथील आवश्यक असणारी मदत केली. बालकल्याण संस्था या ठिकाणी परिसर स्वच्छता
करण्यात आली.
यावेळी प्रा. डी. एस. जांभुळकर उपस्थित होते. औंध शासकीय रूग्णालय आणि दापोडी रेल्वे स्टेशन या ठिकाणी परिसर स्वच्छ केला. प्रा. ए. एम. इनामदार, प्रा. डी. एस कुलकर्णी, डॉ. एम. एम. बागुल यावेळी उपस्थित होते.संस्थेत काम करताना विद्यार्थ्यांचे आयुष्य कसे असते याचा अनुभव आल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. कार्यक्रमाची संकल्पना प्राचार्य डॉ.नितीन घोरपडे यांची असून नियोजन प्रा. डी. एस. जांभुळकर, प्रा. ए. एम. इनामदार, प्रा.डी. एस कुलकर्णी, डॉ. एम. एम. बागुल यांनी केले.