आसाममध्ये ४० लाख लोकांचे वास्तव्य अवैध; सिटीझनशिप रजिस्टर जारी

गुवाहाटी – पूर्वेकडील राज्यांमधून देशात मोठ्या प्रमाणावर घुसखोरी होत असते. यावर चाप बसावा म्हणून आसामचे नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझनशिप (NRC) प्रसिद्ध करण्यात आले आहे. यानुसार आसाममधील २.८९ कोटी लोकांचे नागरिकत्व वैध आहे तर तब्बल ४० लाख लोकांचे नागरिकत्व अवैध आहे.

एनआरसी प्रसिद्ध झाल्यानंतर आसाममध्ये कोणताही हिंसाचार उफाळू नये यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच अफवा न पसरण्यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. शिवाय आसाम आणि त्याच्या शेजारच्या राज्यांमध्ये सुरक्षेसाठी सीआरपीएफच्या २२० कंपन्यांना पाठविण्यात आले असून त्या राज्याचा सीमारेषाही सील करण्यात आल्या आहेत. तर बारपेटा, दरांग, हसाओ, सोनितपूर, करीमगंज, गोलाघाट आणि धुबरी या सात जिल्ह्यांमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, एनआरसी प्रसिद्ध झाल्यांनतर तब्बल ४० लाख लोकांचे नागरिकत्व अवैध आल्याने त्यांची निर्वासित होण्याची शक्यता आहे. परंतु या ४० लाख लोकांना निवार्सित करणार नसल्याचे आश्वासन आसाम सरकारमार्फत देण्यात आले आहे. तसेच हा ड्राफ्ट आहे अंतिम सूची नव्हे, असेही सरकारकडून सांगण्यात आले आहे. या लोकांना आपले नागरिकत्व सिद्ध करण्याची आणखी एक संधी दिली जाणार असून त्यांना ३० ऑगस्टपासून ते २८ सप्टेंबरपर्यंत एक फॉर्म भरावा लागणार आहे. यामध्ये तुमचे नागरिकत्व अवैध का ठरले याचे स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे.

काय आहे एनआरसी-

१९७१ च्या आधीपासून आसाममध्ये राहत असणाऱ्या लोकांचे नाव, पत्ते आणि फोटोग्राफ यामध्ये आहेत. देशात लागू असलेल्या नागरिकत्वाच्या कायद्यापेक्षा आसामचा कायदा थोडा वेगळा आहे. यानुसार २४ मार्च १९७१ च्या मध्यरात्रीपर्यंत ज्यांनी भारतात प्रवेश केला. त्यांनाच आसामचे नागरिक मानण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)