नवी दिल्ली – नोटाबंदीचा आज चौथा वर्धापन दिन आहे. 8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री 8 वाजता 500 आणि 1000 रूपयांच्या नोटाबंदीची घोषणा केली होती.
‘नोटाबंदीचे पाऊल उचलल्यामुळे काळा पैसा कमी होण्यास मदत झाली आहे. कर अनुपालन आणि औपचारिकतेत वाढ झाली असून पारदर्शकतेला चालना मिळाली आहे. हे बदल राष्ट्रीय प्रगतीसाठी मोठ्या प्रमाणात फायदेशीर ठरले आहेत’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
Demonetisation has helped reduce black money, increase tax compliance and formalization and given a boost to transparency.
These outcomes have been greatly beneficial towards national progress. #DeMolishingCorruption pic.twitter.com/A8alwQj45R
— Narendra Modi (@narendramodi) November 8, 2020
काॅंग्रेस नेते राहूल गांधी यांनी सरकारच्या नोटीबंदीच्या निर्णयावर टीका केली आहे. नोटाबंदीच्या निर्णयाने भारतीय अर्थव्यवस्था उद्धवस्त झाली असल्याचे राहूल गांधी यांनी म्हटले आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, नोटाबंदीमुळे काळ्या पैशावर अभूतपूर्व पद्धतीने अंकुश आला आणि कर वसुलीच्या बाबतीत अनुपालन सुधारले. तसेच यामुळे डिजिटल अर्थव्यवस्थेलाही प्रोत्साहन मिळाले. नोटाबंदीनंतर केलेल्या सर्वेक्षणात कोट्यवधी रूपयांची अघोषित मालमत्ता उघडकीस आली. ‘ऑपरेशन क्लीन मनी’ने देशाच्या अर्थव्यवस्थेला संघटित करण्यासही हातभार लावला, असे सीतारमण यांनी म्हटले.