नवी दिल्ली – कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत त्यांना राफेल भ्रष्टाचार, नीरव मोदी आणि व नोटाबंदी यांच्यावर चर्चा करण्यास आपण तयार आहोत, परंतु मोदी मात्र यावर चर्चा करण्यास घाबरतात, असा दावा ट्विटरच्या माध्यमातून केला आहे.
राहुल गांधी म्हणाले, प्रिय पंतप्रधानजी राफेल आणि अनिल अंबानी, नीरव मोदी व नोटाबंदी या विषयांवर मी तुमच्यासोबत चर्चा करण्यास तयार आहे. असे राहुल गांधी यांनी ट्विटरवर लिहिले आहे. त्यांनी अगोदरही अश्या प्रकारचे वक्तव्य केले होते.