चंदा कोचर आणि वेणू गोपाल यांच्या घरावर ‘ईडी’चा छापा

मुबंई – आयसीआयसीआय-व्हिडिओकॉन कर्ज घोटाळा प्रकरणी आयसीआयसीआयच्या बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि व्हिडिओकॉनचे वेणूगोपाल धूत यांच्याशी संबंधित मुंबई व औरंगाबाद येथील ठिकाणांवर ईडीकडून छापेमारीची कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ईडीच्या अधिकाऱ्यांनी एकावेळी 15-16 ठिकाणी छापे टाकल्याची माहिती समोर येत आहेत.

ईडीने म्हटले आहे की, आयसीआयसीआयच्या बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांच्या विरूध्द मुंबई आणि व्हिडिओकॉनचे वेणूगोपाल धूत यांच्या औरंगाबादस्थित ठिकाणांवर मनी लॉंडरिंग कायदा प्रतिबंध अंतर्गत कारवाई चालू आहे.

दरम्यान ,पदांचा गैरवापर करत मर्जीतल्या लोकांचा आर्थिक फायदा केल्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CBI) चंदा कोचर, वेणूगोपाल धूत यांच्यासह इतर पाचजणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

चंदा कोचर, वेणुगोपाल धूत यांच्यावर सीबीआयकडून गुन्हा दाखल

सीबीआयकडून चंदा कोचर यांना लूकआऊट नोटीस

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)