विरोधी पक्षांच्या मतदान यंत्राबाबत शंका कायम

विरोधी पक्षांचे शिष्टमंडळ निवडणूक आयोगाला भेटणार

नवी दिल्ली – इव्हीएमविरोधात सोमवारी सायंकाळी 5.30 वाजता निवडणूक आयोगाकडे सर्व विरोधी पक्ष जाणार असल्याचे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितले. या गंभीर बाबीकडे विरोधी पक्षांनी सरकार आणि निवडणूक आयोगाकडे अनेक वेळा शंका व्यक्‍त करूनही त्यांच्याकडून खात्री होईल, अशा पद्धतीने स्पष्टीकरण झालेले नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

निकोप लोकशाहीसाठी मतदान यंत्रणा त्रुटीहून असण्याची गरज आहे. तो राजकीय पक्षांबरोबरच देशातील प्रत्येक मतदाराचा मूलभूत अधिकार आहे. या अधिकाराचे रक्षण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे राहुल गांधी म्हणाले.

केंद्र सरकारने अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. यावर राहुल गांधी यांनी जोरदार हल्ला चढविला. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शेतकरी, बेरोजगारांना सवलती दिल्या आहेत. देशाच्या सार्वभौम संस्थांवर होणारे हल्ले, राफेल घोटाळ्याचा मुद्दाही आम्ही उठवणार आहोत, असेही राहुल यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)