स्वच्छ भारत मोहिमेचे इतर देशांमध्ये अनुकरण -नरेंद्र मोदी

कुरुक्षेत्र – स्वच्छ भारत मोहिमेचे अनुकरण जगाचे अन्य देश करत आहेत. जनतेचा संकल्प तसेच समर्पणाच्या शक्तीमुळेच हे शक्‍य झाले आहे. बेटी बचाओ, बेटी पढाओ योजनेमुळे मुलींच्या संख्येत सुधारणा झाली आहे. उज्ज्वला योजनेमुळे भगिनींना धुरापासून मुक्ती मिळाली. राष्ट्रीय पोषण कार्यक्रम आणि सुरक्षित मातृत्व मोहिमेमुळे गर्भवती महिलांच्या जीवाला असलेला धोका कमी झाल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे.

मोदी यांनी पहिल्या आयुष विद्यापीठाच्या नव्या केंद्राचे उद्‌घाटन केले आहे. कुरुक्षेत्र येथील स्वच्छ शक्ती 2019 च्या अंतर्गत अनेक प्रकल्प तसेच पानिपत येथील युद्धस्मारकांचे मोदींनी भूमिपूजन केले आहे. बेटी बचाओ, बेटी पढाओ मोहीम, तसेच माजी सैनिकांना वन रॅंक, वन पेन्शन देण्याची घोषणा येथूनच केली होती, ज्यांची पूर्तता करण्यात आली आहे.

सर्वात मोठी आरोग्य योजना आयुष्मानची पहिली लाभार्थी देखील हरियाणाची कन्याच होती. स्वच्छ शक्ती मोहिमेच्या तिसऱया टप्प्याचा प्रारंभ देखील हरियाणातून होत असल्याचे उद्‌गार मोदींनी काढले आहेत. कोणताही समाज इतिहासाला नाकारून अस्तित्वात राहू शकत नाही. इतिहासाशी जोडले गेलेलेच इतिहास निर्माण करतात. हिंदुस्थानचा इतिहास 1947 पासून तसेच एकाच कुटुंबापासून सुरू होत असल्याची काहींची धारणा आहे. या धारणेमुळेच देशाला खऱ्य़ा इतिहासापासून दूर नेण्याचे पाप केल्याचे मोदी म्हणाले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)