सरकारच्या योजनांमुळे औषधांच्या किमतीत घट -पियुष गोयल

नवी दिल्ली – आयुष्मान भारत योजनेमुळे गरिबांचे तीन हजार कोटी रुपये वाचल्याचा दावा हंगामी अर्थमंत्री पियुष गोयल यांनी केला आहे. आम्ही देशातील सर्वात मोठी स्वास्थ्य योजना आयुष्मान भारत गोरगरिबांना उपलब्ध करून दिली. त्याद्वारे 50 कोटी लोकांवर उपचार करण्याची व्यवस्था केल्याचा दावा गोयल यांनी केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून औषधांच्या किमतीमध्ये कपात झाली आहे. त्याचा फायदाही गरिबांना मिळत आहे. सरकारने औषध दुकानातून रुग्णांना स्वस्त औषधं उपलब्ध करून दिली आहेत. गोयल यानी गुरुवारी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये मध्यमवर्गीय आणि शेतकऱ्यांसाठी घोषणांचा पाऊस पडला आहे.

आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता भाजपा सरकारने सर्वसमावेक्षक अर्थसंकल्प सादर केला आहे. केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी आयुष्मान भारत योजनेचा अनेक गोरगरिबांना रुग्णांना फायदा झाला आहे. या योजनेंतर्गत आतापर्यंत दहा लाख रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)