राष्ट्रीय लेझर रन स्पर्धा : महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद

पुणे – महाराष्ट्राने 195 गुणांसह दुसऱ्या राष्ट्रीय लेझर रन स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. भारतीय मॉडर्न पेन्टॅथलॉन महासंघातर्फे शिवछत्रपती क्रीडानगरीत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आंध्र प्रदेशने 63 गुणांसह उपविजेतेपद पटकाविले.तामिळनाडूला तिसरा क्रमांक मिळाला. त्यांनी 27 गुणांची कमाई केली.

महाराष्ट्राने या स्पर्धेत 13 सुवर्ण, 5 रौप्य आणि 6 ब्रॉंझ अशी एकूण 24 पदके पटकावली. आंध्र प्रदेशला 1 सुवर्ण, 4 रौप्य आणि 5 ब्रॉंझ अशी 10 पदके मिळाली. तामिळनाडूने 1 सुवर्ण, 1 रौप्य आणि 2 ब्रॉंझपदकाची कमाई केली. या स्पर्धेतील 15 वर्षांखालील मुलींच्या 4 बाय 400 मीटर धावणे आणि 7 मीटर नेमबाजी या प्रकारात महाराष्ट्राच्याच मुलींनी वर्चस्व राखले. अनन्या नामदे हिने 8 मिनिटे 53.81 सेकंद वेळ नोंदवून सुवर्णपदक मिळवले, तर मुग्धा वाव्हळने 9 मिनिटे 02.31 सेकंद अशी वेळ नोंदवून रौप्यपदक घेतले. नंदिनी मेणकरने 9 मिनिटे 14.03 सेकंदासह ब्रॉंझपदकाची कमाई केली.

13 वर्षांखालील मुलींच्या 3 बाय 400 मीटर धावणे आणि 5 मीटर नेमबाजीमध्ये तमिळनाडूच्या सी. मित्रा श्रीया हिने 6 मिनिटे 39.92 सेकंद वेळ नोंदवून सोनेरी कामगिरी केली. महाराष्ट्राच्या श्रेया मालुसरे (6 मि. 41.07 से.) आणि वैभवी भोईटे (6 मि. 50.38 से.) यांनी अनुक्रमे रौप्य आणि ब्रॉंझपदक पटकावले. 17 वर्षांखालील 4 बाय 400 मीटर धावणे व 10 मीटर नेमबाजी प्रकारात महाराष्ट्राच्या सायली गांजळेने 8 मिनिटे 47.50 सेकंद वेळ नोंदवून सुवर्णपदक पटकावले. महाराष्ट्राच्या आयुषी गणात्राने (9 मि. 16.28 से.) रौप्य, तर तमिळनाडूच्या डी. प्रभा लक्ष्मीने (9 मि. 26.86 से.) ब्रॉंझपदक मिळवले.

स्पर्धेतील पुरुष गटात (40 ते 49 वर्षे) महाराष्ट्राच्या अनिल हनगडीने (9 मि. 03.25 से.) सुवर्ण, तमिळनाडूच्या पी. लिबिन राजने (9 मि. 21.97 से.) रौप्य आणि महाराष्ट्राच्या नीलेश ओसवालने (9 मि. 35.22 से.) ब्रॉंझपदक पटकावले. पारितोषिक वितरण प्रसंगी भारतीय ऑलिंपिक महासंघाचे सहसचिव नामदेव शिरगावकर, राज्याचे क्रीडा सहसंचालक जयप्रकाश दुबळे, उपसंचालक आनंद वेंकेश्‍वर, भारतीय शालेय क्रीडा महासंघाचे समन्वयक गौरव दीक्षित, सुनील पूर्णपात्रे, विठ्ठल शिरगावकर, विनय मराठे, सायली ठोसर,जितेंद्र खासनिस आदी उपस्थित होते.

अन्य निकाल – 11 वर्षांखालील मुले (2 बाय 400 मीटर धावणे, 5 मीटर नेमबाजी) – अवनीश मुळे (महाराष्ट्र) – 4 मिनिटे 20.92 से., आदित ब्राह्मणकर (महाराष्ट्र) – 4 मिनिटे 29.00 से., शेख निहाल वॉरिअर (आंध्र प्रदेश) – 4 मिनिटे 30.45 से. मुली – श्रावणी नीलवर्ण (महाराष्ट्र) – 4 मिनिटे 36.30 से., अन्वेशा सिंग (महाराष्ट्र) – 4 मिनिटे 59.50 सेकंद, धन्यता ओसवाल (महाराष्ट्र) – 5 मिनिटे 04.97 से.15 वर्षांखालील मुले (4 बाय 400 मीटर, 7 मीटर शूटिंग) – अर्जुन आडकर (महाराष्ट्र) – 7 मिनिटे 36.76 से., एम. वेंकट (आंध्र प्रदेश) – 8 मिनिटे 08.00 से., एस. वमण (तमिळनाडू) – 8 मिनिटे 18.06 से. 13 वर्षांखालील मुले (3 बाय 400 मीटर, 5 मीटर शूटिंग) – नील वैद्य (महाराष्ट्र) – 6 मिनिटे 39.89 से., आदित्य कुंवर (महाराष्ट्र) – 6 मिनिटे 41.65 से., आर. दीवेनकुमार (आंध्र प्रदेश) – 6 मिनिटे 41.85 से.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)