राष्ट्रीय मानवाधिकारांची टीम ‘जामियात’ दाखल

नवी दिल्ली : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या (एनएचआरसी) सात सदस्यीय पथकाने शुक्रवारी जामिया मिलिया इस्लामिया (जेएमआय) विद्यापीठातील ग्रंथालयाची पाहणी केली. जामिया विद्यापीठात पोलिसांनी विद्यार्थ्यांविरोधात बळाचा वापर केला होता.

विद्यापीठाचे प्रवक्ते अजीम अहमद म्हणाले की एसएसपी (तपास) मंजिल सैनी यांच्या नेतृत्वात सात सदस्यांच्या पथकाने आज विद्यापीठातील ग्रंथालयाची पाहणी केली. १५ डिसेंबर रोजी घडलेल्या संपूर्ण घटनेची पाहणी केली.

नागरिकता दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) विरोधात जामियाच्या विद्यार्थ्यांनी गेल्या आठवड्यात निर्दशने केली होती. यावेळी परिसरात हिंसाचार झाला  होता.

विद्यापीठ प्रशासनाचा आरोप आहे की १५ डिसेंबर रोजी पोलिस परवानगी न घेता विद्यापीठाच्या परिसरात घुसले आणि  ग्रंथालयात अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला केला होता. या घटनेमुळे विद्यापीठाच्या मालमत्तेचे  नुकसान झाले, तर अनेक विद्यार्थी जखमीही झाले. कुलगुरूनी सरकारकडे या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.