एनजीटी ने फटाक्यांवरील बंदीचा कालावधी वाढविला

नवी दिल्ली –  कोरोनाचं सावट आणि  वायू प्रदूषणामुळे ढासळणारी हवेची गुणवत्ता लक्षात घेऊन राष्ट्रीय हरित लवादाने (NGT) फटाके संदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. दिल्ली-एनसीआर आणि हवेची गुणवत्ता खराब असलेल्या देशातील सर्व शहरांमध्ये फटाक्यांच्या विक्री व वापरावरील बंदी वाढविली असल्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने निर्गमित केले आहेत.

एनजीटीने ख्रिसमस आणि नवीन वर्षादरम्यान  केवळ अर्धा तास फटाके फोडण्याची परवानगी दिली आहे. आदेशानुसार रात्री 11.55 ते 12.30 या दरम्यानच फटाके फोडता येतील. तसेच, जेथे हवेची गुणवत्ता सामान्य किंवा चांगली आहे, अशा ठिकाणी हरित फटाके उडविण्याची परवानगी दिली आहे.
याशिवाय एनजीटीने जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या जिल्ह्यात फटाकेविक्री होऊ नये तसेच उल्लंघन करणार्‍यांनाकडून दंड आकाराण्याबाबत निर्णय घेण्यास सांगितले आहे.

दरम्यान, दिल्ली सरकारने यापूर्वी फटाके विक्रीवर बंदी घातली आहे. आता एनजीटीने वायू प्रदूषणाची पातळी पाहता फटाक्यांवरील बंदीचा कालावधी वाढविला आहे. नव्या आदेशानुसार ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने फक्त 35 मिनिटांसाठी फटाके फोडण्याची परवानगी एनजीटीकडून देण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.