पुणे – बंगळुरू येथे पार पडलेल्या आयजीयू साऊथर्न इंडिया कुमार गोल्फ अजिंक्यपद 2019 स्पर्धेत पुण्यातील गोल्फपटू आर्यमान सिंग याने चमकदार कामगिरी केली. बंगळूर येथील क्लोव्हर ग्रीन्स येथे 20 ते 24 मे या कालावधीत पार पडलेल्या या स्पर्धेत संपूर्ण देशभरातील अव्वल कुमार गोल्फपटूंनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आर्यमानने क गटात उपविजेतेपदाचा मान मिळवला.
आर्यमानने एकूण तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेतील क गटात 69, 71 व 68 अशा तीन फेऱ्यांमधील गुणांबरोबरच एकूण 2 अंडर पार अशा गुणांकाची नोंद करीत दुसरा क्रमांक पटकावला. बंगळुरू येथे जाहली आयजीयू साऊथर्न इंडिया कुमार गोल्फ अजिंक्यपद 2019 ही स्पर्धा भारतातील सर्वोत्तम व प्रतिष्ठित अशा 4 कुमार गटाच्या स्पर्धांमधील एक स्पर्धा मानली जाते. तसेच या स्पर्धेत पदक मिळविण्यात यशस्वी ठरलेला आर्यमान हा महाराष्ट्राचा एकमेव गोल्फपटू ठरला.