गोव्याचे मुख्यमंत्री रूग्णालयातून क्‍लिअर करीत आहेत फायली

प्रातिनिधिक छायाचित्र

त्यांच्यामुळे प्रशासनाचे काम अडलेले नाही – मंत्र्यांचा दावा

पणजी – गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे रूग्णालयातून प्रशासकीय कामकाज करीत असून ते फायलीही क्‍लिअर करीत आहेत त्यामुळे त्यांच्या मुळे प्रशासनाचे काम अडून राहिले आहे असे झालेले नाही असा दावा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पर्रिकर सध्या दिल्लीच्या एम्स रूग्णालयात उपचार घेत आहेत. गोवा सरकारने पोर्तुगीज सरकारशी पाणी पुरवठा व मलनिस्सारण प्रकल्पाच्या बाबतीत आज एक सामंजस्य करार केला. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना ढवळीकर यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की राज्यातील प्रत्येक मंत्री आपआपले खाते सांभाळण्यास सक्षम आहे. आम्ही सर्व मिळून राज्याचा कारभार कार्यक्षमपणे हाकत आहोत. तसेच खुद्द मुख्यमंत्रीही रूग्णलयातून आवश्‍यक त्या प्रशासकीय बाबींवर निर्णय देत आहेत त्यामुळे प्रशासनाचे कोणतेच काम अडलेले नाही.

मुख्यमंत्र्यांच्या वारंवारच्या प्रकृती अस्वास्थ्यतेमुळे सरकारी काम रेंगाळत असल्याचा दावा कॉंग्रेसने केला आहे. सध्याचे गोवा सरकारच आयसीयुत असल्यासारखी स्थिती निर्माण झाल्याचे कॉंग्रेसने म्हटले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर ढवळीकर यांनी ही माहिती देत कॉंग्रेसचा दावा फेटाळून लावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)