“या’ पक्षाच्या मुख्यालयावर तिरंगा फडकावण्याचा प्रयत्न

स्वतंत्र राष्ट्रध्वजाच्या मागणीविरोधात कृत्य

जम्मू – पिपल्स डेमोक्रॅटीक पार्टी या काश्‍मीरमधील राजकीय पक्षाच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती आणि जम्मू-काश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्याशी समेट घडवत, केंद्र सरकारच्या कलम 370 रद्द करण्याच्या कृतीविरोधात एक दबाव गट स्थापन केला आहे. हा दबावगट कलम 370 आणि कलम 15ए च्या पुनर्स्थापनेची मागणी करणार असून या गटाला जम्मू-काश्‍मीरचे विभाजन करुन काश्‍मीर आणि लडाख हे केंद्राशासित प्रदेश मान्य नाहीत. आपल्या लढ्याचे चिन्हा म्हणून या दबाव गटाने ” आझाद काश्‍मीर’चा जुनाच झेंडा आपला ध्वज म्हणून वापरण्याचे ठरवले आहे.

मात्र, जम्मूमधील काही राष्ट्रप्रेमी युवकांनी याविरोधात जात, एका मोर्चाद्वारे आज विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या मुहूर्तावर पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांच्या पक्षाच्या मुख्यालयावर तिरंगा फडकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने हा तिरंगा युवकांना फडकावता आला नाही. “तिरंगे का अपमान नहीं सहेंगे’ अशा घोषणा देणारे हे अमनदीप सिंग यांच्या नेतृत्वात युवक मुफ्ती आणि अब्दुल्ला यांच्या निषेधाच्या घोषणाही देत होते. कोणत्याही पक्षाशी आमचा संबंध नाही. आम्ही मूलभूतपणे राष्ट्रवादी आहोत आणि तिरंग्याचा कोणताही अपमान सहन करणार नाही, हा आमचा अभिमान आणि सन्मान आहे, असे अमनदीप सिंग यांनी पत्रकारांना सांगितले.

अमनदीप सिंग यांनी शनिवारी पीडीपी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सीमेच्या भिंतीवर राष्ट्रध्वज फडकविला होता आणि माजी आमदार फिरदौस अहमद टाक यांच्यासह पक्षाच्या दोन वरिष्ठ नेत्यांशी त्यांचा जोरदार वाद झाला होता. त्याचवेळी सिंग यांनी आपण रविवारी याच इमारतीवर ाष्ट्रध्वज फडकावण्यासाठी परत येण्याचे सूतोवाच केले होते.

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात लागू करण्यात आलेले घटनात्मक बदल मागे न घेईपर्यंत निवडणूक लढवण्यास किंवा तिरंगा फडकावण्यात आपल्याला रस नसल्याचे मुफ्ती यांनी सांगितले. त्यांच्या या वादग्रस्त विधानांनंतर आज (रविवारी) ही प्रतिक्रिया उमटली आहे. शनिवारी जम्मू-काश्‍मीरला विशेष दर्जा मिळाल्याबद्दल संघर्ष करीत असलेल्या पीपल्स अलायन्स फॉर गोपकर घोषणेची श्रीनगर येथे बैठक झाली आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला यांना अध्यक्ष व उपाध्यक्षपदी मेहबुबा मुफ्ती यांची निवड करण्यात आल्यानंतर काश्‍मीर खोऱ्यातले वातावण तापत चालले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.