नवी दिल्ली – राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हे भारतीय कलाकारांसाठी नेहमीच खास असतात आणि देशभरातील कलाकारांना सन्मानित करत 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची आज दिल्लीत घोषणा करण्यात आली. नॅशनल मीडिया सेंटर, दिल्ली येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट अभिनेत्यापासून ते गायकापर्यंत पुरस्कार देण्यात आले.
या संपूर्ण कार्यक्रमात सर्वांच्या नजरा सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्रीच्या नावावर होत्या आणि आता हे नावही समोर आले आहे. यंदा दोन कलाकारांना हा पुरस्कार मिळाला आहे. अजय देवगण आणि दाक्षिणात्य अभिनेता सूर्या यांना 68 वा राष्ट्रीय चित्रपट सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
अजय देवगणला हा पुरस्कार त्याच्या ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ चित्रपटासाठी मिळाला आहे. अजय देवगणसाठी त्याचा हा चित्रपट अनेक अर्थांनी खास आहे. अभिनेत्याच्या कारकिर्दीतील हा 100 वा चित्रपट होता. या चित्रपटात अजय देवगण शूर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या भूमिकेत आहे, जो मराठा साम्राज्य पुन्हा काबीज करण्यासाठी निर्दयी मुघल सरदार उदयभान सिंग राठोड (सैफ अली खान) याच्या विरोधात लढतो. या चित्रपटाने 250 कोटींहून अधिक कमाई केली होती.
यासोबतच सूर्याला ‘सोराराई पोतरू’(Soorarai Pottru) साठी सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. सूर्याचा ‘सूरराय पोत्रू’ हा चित्रपट 2020 साली प्रदर्शित झाला, जो बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. मात्र, हा चित्रपट संपूर्ण भारतात प्रदर्शित झाला नाही आणि म्हणूनच या चित्रपटाचा रिमेकही बनवला जाणार आहे. अक्षय कुमार या चित्रपटाच्या रिमेकमध्ये दिसणार आहे, ज्याचे शूटिंग सुरू झाले आहे आणि सुर्याही त्याच्या चित्रपटाच्या रिमेकमध्ये दिसणार आहे.