दिल्लीसह इतर राज्यात इंधनदरवाढीचे सत्र कायम

विविध शहरातील इंधनाचे दर

मुंबई : पेट्रोल (90.22), डिझेल (78.69)
पुणे : पेट्रोल (90.05), डिझेल (77.33)
चेन्नई : पेट्रोल (86.13), डिझेल (78.36)
कोलकत्ता : पेट्रोल (84.68), डिझेल (75.97)

नवी दिल्ली: पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये मंगळवारी पुन्हा एकदा वाढ झाली असून इंधनदरवाढीचे सत्र सुरूच अाहे. आज दिल्लीमध्ये पेट्रोलच्या दरामध्ये लीटरमागे 14 पैसे आणि डिझेलच्या दरामध्ये लीटरमागे 10 पैशांनी वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 82.86 रुपये तर डिझेलचे दर प्रतिलीटर 74.12 रुपये इतक्‍या उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत.

दिल्लीमध्ये 1 सप्टेंबर रोजी पेट्रोलचा दर 78.68 रुपये प्रति लिटर, तर डिझेलचा दर 70.42 रुपये प्रति लिटर असा होता. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दिवसापासून ते आजच्या तारखेपर्यंत पेट्रोलचे दर 4.18 रूपयांनी तर डिझेलचे दर 3.07 रूपयांनी वाढले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तर महाराष्ट्रातील मुंबईमध्ये आज पेट्रोलचा दर प्रति लिटर  90.22 रूपये तर डिझेलचा दर 78.69 रूपये इतका झाला आहे. मुंबईमध्ये सुध्दा पेट्रोलच्या दराने पहिल्यादांच नव्वदी पार केली आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे दरात गेल्या काही दिवसापासून सातत्याने वाढ होत असून सामान्य नागरिकांच्या खिशाला झळ बसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड आॅईलच्या किंमतीतील चढउतार आणि डाॅलरच्या तुलनेत रूपयांच अवमूल्यन होत असल्याने इंधनदरवाढ होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

तेल उत्पादक देशांचा संघटना असलेल्या अोपेकने (The Organization of the Petroleum Exporting Countries (OPEC) ) कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवण्यास नकार दिल्याने कच्च्या तेलाची किंमत 80 डाॅलर प्रति बॅलरहून अधिक झाली आहे. तसेच अमेरिकेने घातलेल्या बंदीनंतर इराणकडून होणारा तेल पुरवठा कमी झाला आहे. त्यामुळे आगामी काळातदेखील या किंमती वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)