पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने इयत्ता दहावीसाठी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (एनटीएस) येत्या 13 डिसेंबर रोजी होणार आहे.
या राज्यस्तरावरील परीक्षेसाठी नियमित शुल्कासह 25 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
“एनटीएस’ परीक्षेसाठी विलंब शुल्कासह 26 ते 30 ऑक्टोबर, अतिविलंब शुल्कासह 31 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर या कालावधीत अर्ज करता येणार आहे. आरक्षणासाठी आवश्यक ती कागदपत्रेही सादर करणे आवश्यक आहे.
राज्य स्तरावरील परीक्षेनंतर राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा पुढील वर्षी 13 जून रोजी होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी दिली आहे.