9 व्या तोलानी नॅशनल ब्रीज चॅम्पियनशिपला उत्साहात सुरूवात
पुणे – उद्घाटनाच्या दिवशी झालेल्या गोल्ड गटात आय डॉक्टर्स या संघाने 46.34 गुण आपल्या नवावर करण्यात यश मिळवत आघाडी घेतली आहे. तर त्या खलोखाल पोकिमान संघाने यानी 45.57 गुण, अरुण जैन संघाने 42.37 गुण मिळवत अनुक्रमे दुसऱ्या आणी तिसऱ्या स्थानवर मजल मारली आहे. सिल्वर गटातही चांगली चुरस दिसुन येत आहे. तीन राऊंडनंतर आर. सी. सी.संघाने 48. 96 गुण मिळवून आघाडी प्रस्थापित केली आहे.
तर त्याखालोखाल ए. बी, बी. संघाने 47. 63 गुण, इझी ब्रिज संघाने 46. 95 आणि अमरोन संघाने 44. 41 गुण आपल्या संघाला मिळवून देत अनुक्रमे दुसरा, तिसऱ्या आणि चवथ्या क्रमांकावर मजल मारत या गटात चांगली सुरवात केली आहे. तर बिगिनर्समध्ये चवथ्या फेरीनंतर रेड डबल संघाने 50. 08, उर्मीला संघाने 39. 31 गुण तर एल. एस. एस. संघाने 35. 11 गुण मिळवीत अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकावर मजल मारली आहे. गोल्ड आणि सिल्वर गटात अजून चार राऊंड्स होणार असून त्यानंतर गुणांच्या क्रमवारीनुसार या गटातून पाहिले 16 संघ पुढील बाद फेरीसाठी पात्र ठरणार आहेत.
ब्रीज फेडेरेशन ऑफ इंडिया, महाराष्ट्र ब्रीज असोसिएशन आणि पुणे रिजन ब्रीज असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने यशदा कॉम्प्लेक्स, बाणेर रोड, पुणे येथे 9 व्या तोलानी समर नॅशनल चॅम्पिअनशिप स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरवात झाली.
तीन बोर्डनंतरची गुंणसंख्या :
गोल्ड :- 1) आय. डॉक्टर्स ( 46. 34 गुण), 2) पोकिमान ( 45. 57 गुण ) 3) अरुण जैन ( 43. 96 गुण ) ) मोहित मेहेता (42. 37 गुण) 5) श्री सिमेंट (40. 00 गुण ) 6) अल्फा (39. 41 गुण ),
7) सी. व्ही. राव ( 39. 37 गुण )8) स्लो स्कॉर्पियन्स ( 37. 92 गुण )
सिल्वर :- 1) आर. सी. सी ( 48. 96 गुण), 2) ए. बी. ए ( 47. 63 गुण ) 3) इझी ब्रिज (46. 95 गुण )4)अमोराना ( 44. 41 गुण ) 5) कायल फोर (43. 48 गुण ) 6) हिराबाग (42. 77 गुण ),
7) टी. बी. ए ( 41. 44 गुण ) 8) स्पार्टन ( 40. 84 गुण )