पुणे – ब्रीज फेडरेशन ऑफ इंडिया, महाराष्ट्र ब्रीज असोसिएशन आणि पुणे रिजन ब्रीज असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत 9 वी तोलानी नॅशनल ब्रीज चॅम्पियनशिप स्पर्धेत गोल्ड स्विस लीग, सिल्वर स्विस लीग आणि बिगिनर्स लीग अश्या तीन गटात खेळविण्यात आलेल्या साखळीच्या आठ राऊंडनंतर या गटांचे बाद फेरीचे चित्र स्पष्ट झाले आहे.
गोल्ड गटात अरुण जैन संघाकडून खेळतांना आंतरराष्ट्रीय खेळाडू देबाशिष रे, अरुण जैन गोपिका टंडन प्रितीश कुशारी यांनी आपल्या दर्जदार खेळाच्या जोरावर सर्वात जास्त 110. 36 गुण संपादन करुन पहील्या क्रमांकाने बाद फेरी गाठली. तर सातव्या राऊडपर्यन्त 4 थ्या स्थानवर असलेल्या हेमा देवरा यांच्या स्लो स्कॉर्पिअन्स संघाकडून खेळतांना गोपिनाथ मन्ना. हेमा देवरा, रामाआवतार अगरवाल, अभिजीत सरकार यांनी शेवटच्या आठव्या राऊंडमध्ये आपल्या बुद्धीचा वापर करुन 100. 57 गुण मिळवत दुसऱ्या क्रमांकने उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
त्याखालोखाल आय डॉक्टर्स संघाने 100.15 गुण आपल्या आपल्या नवावर करून तिसऱ्या क्रमांकाने बाद फेरी गाठली. यामध्ये अरुण जैन, स्लो स्कॉर्पिअनर्स, आय. डॉक्टर्स, श्री रेडडी, फॉर्मिंडेबल्स, सी. व्ही. राव, धमपूर शुगर, श्री सिमेंट, पेरिटीज, राम्पागे, समाधान, पोकिमान, एस.बी. सी. ब्लू, आय.टी.एस.आर.सी, ऍक्वेरियस, व्ही फोर या पहिल्या सोळा संघांनी उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला आहे.