राष्ट्रीय बाॅक्सिंग स्पर्धा : सोनिया व भाग्यबती यांची सुवर्णकामगिरी

सहा सुवर्णापदकांसह स्पर्धेत रेल्वेचे वर्चस्व

कन्नूर : विश्वचषक स्पर्धेतील रौप्यपदक विजेती सोनिया चहल (५७ किलो) आणि इंडिया ओपन सुवर्णपदक विजेती भाग्यबती कचारी (८१ किलो) यांनी चौथ्या एलिट महिला राष्ट्रीय बाॅक्सिंग स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करत रेल्वेला सहा सुवर्णपदके जिंकून दिली. स्पर्धेत हरियाणाचा संघ दुस-या तर अखिल भारतीय पोलिसांचा संघ तिस-या स्थानी राहिला.

२०१६ च्या राष्ट्रीय विजेत्या सोनियाने हरियाणाच्या युथ वर्ल्ड चॅम्पियन साक्षीला ३-२ अशा फरकाने पराभूत केलं तर ८१ किलो गटाच्या अंतिम सामन्यात भाग्यबती कचारीने शैली सिंगला ५-० ने पराभूत करत सुवर्णपदकास गवसणी घातली.युथ वर्ल्ड चॅम्पियन ज्योतीने रेल्वेकडून खेळताना हरियाणाच्या रितू ग्रेवालचा ५-० ने पराभव केला. मोनिकाने ४८ किलो वजनीगटात अखिल भारतीय पोलिसांच्या के.बीना देवीला ५-० ने पराभूत करून विजय मिळवला.

रेल्वेच्या पविलाओ बासुमात्रीने ६४ किलो वजनीगटात अंकुशिता बोरोचा ३-२ ने पराभव केला. मीनाकुमारीने अंतिम सामन्यात मीनाक्षीचा ४-१ ने पराभव करत विजय संपादित केला. हरियाणा संघास एकमेव सुवर्णपदक नुपूरने ७५ किलो वजनी गटात मिळवून दिले. नुपूरने केरळच्या इंद्राजाचा ४-१ ने पराभव केला. अर्जुन पुरस्कार आणि दोन वेळच्या जागतिक अंजिक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारी कविता चहल हिने हरियाणाच्या अनुपमावर ५-० ने विजय मिळवला

Leave A Reply

Your email address will not be published.