राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पुण्याची तारा शहा विजेती

पुणे- तारा शहा या पुण्याच्या खेळाडूने सबज्युनिअर गटाच्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेतील 15 वर्षाखालील गटात विजेतेपद पटकाविले. ही स्पर्धा इंफाळमध्ये घेण्यात आली.

द्वितीय मानांकित तारा हिने अंतिम सामन्यात तस्मीन मीर या अग्रमानांकित खेळाडूचा पराभव केला. अटीतटीने झालेला हा सामना तिने 21-13, 22-24, 21-15 असा जिंकला. तिने या लढतीत स्मॅशिंगच्या जोरकस फटक्‍यांचा बहारदार खेळ केला. तसेच तिने नेटजवळून प्लेसिंगचाही कल्पकतेने उपयोग केला. उपांत्य फेरीत तिने अनुपमा उपाध्याय हिच्यावर 17-21, 21-14, 21-12 असा विजय मिळविला.

तारा हिने या स्पर्धेतील 17 वर्षाखालील गटातही भाग घेतला होता. या गटातील उपांत्यपूर्व फेरीत तिला कृती भारद्वाजकडून हार मानावी लागली. हा सामना कृतीने 21-10, 13-21, 21-18 असा जिंकला. तारा ही येथील ऑलिंपिकपटू निखिल कानेटकर यांच्या मार्गदर्शनाखाली
सराव करते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.