देशाला जाणून घ्यायचे आहे, पंतप्रधानांना अमेरिकेला जाण्यास परवानगी कशी मिळाली? त्यांनी तर कोव्हॅक्सिन घेतली

नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकी दौऱ्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी ट्विट केले की, ‘माझ्या माहितीप्रमाणे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोव्हॅक्सिन लस घेतली होती. ज्याला अमेरिकेत मान्यता नाही. त्यांनी दुसरे कोणते लसीकरण केले आहे का?

किंवा त्यांना अमेरिकी प्रशासनाने विशेष सूट दिली आहे. असे ट्विट त्यांनी केले आहे. दिग्विजय सिंह पुढे लिहतात की, देशाला जाणून घ्यायचे आहे की, कोव्हॅक्सिन घेतलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेत परवानगी कशी मिळाली?

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले आहेत. मात्र अमेरिकी सरकाकडून कोव्हॅक्सिन घेतलेल्यांना देशात येण्यास परवाणगी नाकारण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींनी हीच लस घेतली आहे. मात्र ते अमेरिकेला गेले आहेत. त्यावरून कॉंग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. की मोदींनी कोव्हॅक्सिन घेतली असतानासुद्धा त्यांना अमेरिकेला जाण्यास परवानगी कशी मिळाली? याबाबत देशाला जाणून घ्यायचे आहे. असे ट्वीट त्यांनी केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.