माझा स्टार्कला पाठिंबा आहे – नॅथन लायन

सिडनी -भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत सर्वसाधारण कामगिरी केल्यानंतरही श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत अनुभवी मिचेल स्टार्कला संधी देण्यात आली आहे. परंतु, या मालिकेत त्याने चांगली कामगिरी केली नाही तर त्याचे संघातील स्थान धोक्‍यात येण्याची शक्‍यता वर्तवली जात असताना ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायनने स्टार्कची पाठराखण केली असून तो संघासाठी खूप महत्त्वाचा खेळाडू असल्याचे म्हटले आहे.

या मालिकेतील दुसरा कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला असून त्यात स्टार्कने दोन्ही डावात मिळून 2 बळी मिळवले होते. पुढील सामना 1 फेब्रुवारीपासून होबार्टच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये नॅथन लायन स्टार्कची पाठराखण करताना म्हणाला, तो सरावात मेहनत घेत असून त्याच्याकडे गती आहे. चेंडू स्विंग करण्याचे क्षमता आहे. त्याने कसोटीमध्ये 200 बळी मिळवले आहेत. तरीदेखील कोणाला त्याच्या क्षमतांवर विश्‍वास नसेल तर सरावात त्याचा सामना करा म्हणजे तुम्हाला समजेल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ऑस्ट्रेलियामध्ये तो आमच्यासाठी खूप महत्त्वाचा खेळाडू असून त्याच्या उपस्थितीचा संघाला फायदाच होतो. त्यामुळे मी त्याला पाठिंबा देतो. भागीदारीत गोलंदाजी करताना कोण जास्त बळी मिळवतो हे महत्त्वाचे नसते तर संघाला फायदा होणे महत्त्वाचे असते. माझी कामगिरी चांगली झाली असली तरी पुढील सामन्यात स्टार्क चांगली कामगिरी करत विजयात मोलाचा वाटा उचलेले अशी अपेक्षा आहे, असेही लायन म्हणाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)