वॉशिंग्टन – नताशा पेरी ही मुळ भारतीय वंशाची अमेरिकेतील विद्यार्थिनी जगातील सर्वात हुशार विद्यार्थिनी ठरली आहे. जॉन हापकिन्स सेंटर तर्फे टॅलेंटेड विद्यार्थि शोधण्यासाठी एक स्पर्धात्मक कार्यक्रम घेण्यात आला होता त्यात 11 वर्षीय नताशा सर्वोत्कृष्ठ ठरली आहे.
या टॅलेंट सर्च मध्ये 84 देशातील 19 हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यात विद्यार्थ्यांच्या बौद्धिक कौशल्याच्या विविध चाचण्यांच्या आधारे शोध घेतला गेला.
नताशा ही ईयत्ता पाचवीत शिकत आहे. तिला या टॅलेंट सर्च मधील चाचण्यांमध्ये 90 टक्के गूण मिळाले. या निवडीमुळे आपल्याला आणखी काही तरी करून दाखवण्याचे प्रोत्साहन मिळाले आहे अशी प्रतिक्रीया तिने दिली आहे. मुलांच्या बौद्धिक क्षमतेत वाढ करण्यासाठी आणि त्यांना त्या अनुषंगाने अभ्यास करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी जॉन हाफकिन्स तर्फे हा सीटीवाय हा उपक्रम राबवण्यात येतो.