Nashik Tragedy : नाशिकमधील घटना ह्रदयद्रावक, घटनेची सखोल चौकशी व्हावी : चंद्रकांत पाटील

मुंबई – नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात घडलेली घटना ही अतिशय धक्कादायक आणि हृदयद्रावक आहे. ऑक्सिजन टाकीच्या गळतीमुळे २२ जणांचा मृत्यू झाला. या घटनेची सखोल चौकशी व्हावी, सगळ्या रुग्णांना लवकरच सुखरुप स्थळी व्यवस्थित हलवले जावे आणि मृतांच्या नातेवाईकांना भरीव मदत मिळाली पाहिजे, अशी मागणी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्यात गेल्या २ महिन्यातील ही आठवी घटना आहे. या सगळ्या घटनांची चौकशी, कारवाई कशाचाही पत्ता नाही. तातडीने या प्रकरणातील दोषींवर गुन्हा दाखल करून कारवाई झालीच पाहिजे, अशी देखील मागणी त्यांनी केली आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.