नाशिक – राज्यात महिला अत्याचाराच्या रोज नवीन घटना समोर येत आहेत. यामध्ये कौटुंबीक अत्याचाराच्या घटना सुद्दा मोठ्या प्रमाणात आहेत. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सासरच्या छळाला कंटाळून महिला सरपंचाने विषारी औषध घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील मरळगोई खुर्द येथे घडला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
योगीता अनिल फापाळे असे आत्महत्या करणाऱ्या महिला सरपंचाचे नाव असून पती, सासु-सासरे व दिरास लासलगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून घेतला आहे. मृत सरपंच योगीता यांच्या भावाने याप्रकरणी फिर्याद दाखल केली होती. अनिल बाबासाहेब फापाळे (पती), बाबासाहेब फापाळे(सासरे), सरला फापाळे(सासु) व प्रदीप फापाळे(दिर) असे सासरकडच्यांची नावे आहेत. पुढिल तपास पोलिस करत आहेत.