नाशिक – नाशिक जिल्ह्यातील कुमावतनगरमध्ये गॅस सिलिंडरच्या स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात 6 कामगार जखमी झाले आहेत. जखमी कामगारांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 6 कामगारांपैकी 2 कामगार 90 टक्के भाजले असल्याची माहिती समोर आली आहे.
लवलेश धरम पाल (रा. अदालतपूर, उत्तर प्रदेश), अखिलेख धरमपाल, विजयपाल फत्तेपूर, संजय मौर्य, अरविंद पाल, वीरेंद्रकुमार (सर्व रा. फतेहपूर, उत्तर प्रदेश) अशी स्फोटात गंभीर जखमी झालेल्या कामगारांची नावे आहेत.
स्फोटात जखमी झालेले सहा कामगार हे टाइल्स बसवण्याचे काम करतात. हे सहाही कामगार कुमावतनगरमध्ये एकत्रित राहत होते. शुक्रवारी सकाळी स्वयंपाक करण्यासाठी गॅस सुरु करत होते. त्यावेळी त्यांच्यातल्या एकाने काडीपेटीची काडी पेटवली. त्याचवेळी गॅस सिलिंडरचा भडका उडला आणि मोठा स्फोट झाला.