नाशिक – नाशिक शहराला हादरा बसवणाऱ्या दोन घटना आज शहरात घडल्या आहेत. एका घटनेमध्ये वडीलांनी मुलाची हत्या करत आत्महत्या केली तर दुसऱ्या घटनेमध्ये 24 वर्षीय तरुणाची चाकूने सपासप वार करत हत्या केली आहे. या तरुणाची एका टोळक्याकडून हत्या करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना म्हसरुळ परिसरात असलेल्या आकाश पेट्राेल पंपाजवळील सावकार गार्डन येथे घडली आहे.
नाशिक हादरले! आधी मुलाचा केला खून नंतर वडिलांनी केली आत्महत्या
राजेंद्र गांगुर्डे, वय 24 असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. राजेंद्र याची ह्त्या पूर्ववैमनस्यातून आणि वर्चस्वाच्या वादातून करण्यात आली असावी असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या हत्येप्रकरणी म्हसरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत मृत तरुणाचा मित्र थोडक्यात बचावला आहे.
राजेंद्र हा शहरात रिक्षा चालवत होता. तसेच तो फरशी बसवण्याचेही काम करत हाेता. राजेंद्र आणि त्याचा मित्र बुधवारी रात्री अकराच्या सुमारास सावकार गार्डन जवळून जात असताना संशयित दीपक पगारे आणि त्याच्या चार ते पाच साथीदारांनी त्या दोघांना अडवून वाद घातला. त्यानंतर चाॅपरने वार करुन यशची हत्या केली. त्याचवेळी यशचा मित्र घटनास्थळावरुन निसटून आला. त्याने घटनेची ओरड करुन कुटुंबाला माहिती दिली. पुढील तपास पोलीस करत आहेत.