नाशिक – नाशिक महापालिकेतील शिवसेनेच्या नगरसेविका कल्पना पांडे यांचे करोना संसर्गामुळे निधन झाले. कल्पना यांना काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर नाशिकमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, आज उपचारादरम्यान त्यांची प्रमाणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने नाशिक शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
कल्पना पांडे ह्या नाशिक महापालिका निवडणुकीत चार वेळा निवडुन आल्या होत्या. सध्या त्या प्रभाग 24 मध्ये शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका म्हणून काम पाहत होत्या. त्यांना महापालिकेच्या कामकाजाचा दांडगा अनुभव होता.
दरम्यान, वाढत्या करोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका मुख्यालयात करोना चाचणी निगेटिव्ह असलेल्यांनाच प्रवेश देण्याचे आदेश महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिले आहेत. महापालिकेतील अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याने महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.