मोठी बातमी ! पुण्यानंतर आता नाशकातही ‘नाईट कर्फ्यू’

नाशिक – नाशिकमध्ये उद्या सोमवारपासून रात्री 11 ते पहाटे पाच या कालावधीत संचारबंदी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी रविवार जाहीर केली. करोना बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे हा निर्णय घेणे प्रशासनाला क्रमप्राप्त ठरल्याचे भूजबळ यांनी पत्रकारांना सांगितले. लॉकडाउन लागू करायचे की नाही याचा निर्णय नागरिक शिस्तीचे कीती पालन करतात आणि करोना नियंत्रणअत टेवतात यावर अवलंबूनअसल्याचे त्यांनी सांगितले.

करोनाचा धोका वाढत असून नियमांचे पालन करा, मास्क न वापरल्यास एक हजार रुपये दंड भरावा लागेल याची जाणवि ठेवा आणि मुख्य म्हणजे आठ दिवसांत स्थिती नियंत्रणात आली नाही तर आहे त्यापेक्षाही कडक निर्णय घ्यावे लागतील, असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले.

लॉकडाऊन करणे नागरिकांना आणि शासनाला देखील परवडणारे नाही. मात्र रुग्णसंख्या वाढत राहिली तर मात्र यावर पुनर्विचार करून निर्णय घ्यावा लागणार आहे. लॉकडाउनचा निर्णय हा पूर्णपणे नागरिकांच्या हातात आहे. जर नागरिकांनी करोनाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन केले. मास्क आणि सॅनिटायजरचा वापर नियमित केला तरच हे शक्‍य आहे. अन्यथा शासनाला याचा पुनर्विचार करावा लागेल. असे ते म्हणअले.

तसेच, नाशिक जिल्ह्यात साधरणपणे हजार सरकारी कर्मचाऱ्यांना लस देण्याचं ठरवण्यात आलं होतं. हजार पैकी हजार जणांनी आतापर्यंत ती लस घेतलेली आहे. आमच्याकडे त्या लसींचा साठा आहे, आमची सर्व कर्मचाऱ्यांना विनंती आहे की, फेब्रुवारीपर्यंत तुम्ही लस घेतली पाहिजे. असंही छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितलं.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.