Rahul Narwekar | मुंबईत सुरू असलेल्या विशेष तीन दिवसीय अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक आमदारांचा शपथविधी पार पडला. त्यानंतर आज विशेष अधिवेशनाचा शेवटचा दिवस असून विधानसभा अध्यक्षांची निवड केली आहे.
भाजप नेते राहुल नार्वेकर यांची आज विधानसभा अध्यक्ष म्हणून पुन्हा नियुक्ती झाली आहे. त्यांनी काल विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. दुपारी १२ वाजेपर्यंतच विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. मात्र कोणीही अर्ज दाखल न केल्याने राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे राहुल नार्वेकर सलग दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारणार आहे.
कोण आहेत राहुल नार्वेकर ?
गेल्या विधानसभेच्या कालावधीत शिंदे-फडणवीस सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात नार्वेकर यांच्याकडेच विधानसभेचे अध्यक्षपद होते. विधानपरिषदेचेही ते सदस्य होते. विविध शैक्षणिक व सामाजिक संघटनांचे विधि सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. ते बी.कॉम. एलएल.बी. आहेत.
वकिली पेशा आणि कायद्याचे अभ्यासक असलेल्या नार्वेकर यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षातील फुटीनंतर सुरू झालेल्या कायदेशीर लढाईत मोठी भूमिका होती. सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना आणि राष्ट्रवादीवरील दावेदारीचा निर्णय घेण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्षांकडे दिल्यानंतर त्यांनी दोन्ही खटल्यांत प्रत्यक्ष सुनावणी घेत निकाल सुनावला. Rahul Narwekar |
विधानसभेचे सर्वात तरुण अध्यक्ष
राहुल नार्वेकर हे विधानसभेचे सर्वात तरुण अध्यक्ष ठरले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. यावेळी कुलाब्यातून सलग दुसऱ्यांदा त्यांनी विजय मिळवला आहे. Rahul Narwekar |
सलग दुसऱ्यांदा निवडून येणारे राहुल नार्वेकर दुसरे अध्यक्ष
विधानसभेच्या अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा निवडून येणारे ॲड. राहुल नार्वेकर हे संयुक्त महाराष्ट्राचे दुसरे अध्यक्ष असणार आहेत. यापूर्वी ज्येष्ठ नेते बाळासाहेब भारदे हे 19962 आणि 1967 असे दोन वेळा अध्यक्ष झाले होते. Rahul Narwekar|
हेही वाचा:
संथ गतीने शेअर बाजार उघडला ; सेन्सेक्स-निफ्टी घसरला, ‘या’ शेअर्समध्ये मोठी घसरण