‘मांसाहारींना शिक्षा देण्यासाठी नृसिंहाने घेतले कोरोनाचे रूप’

नवी दिल्ली – चीनसह जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. चीनमध्ये कोरोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या 1,665 वर पोहोचला आहे. तर 68,500 जणांना या व्हायरसची बाधा झाली आहे. भारतासह जगभरात कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी दिवस-रात्र संशोधन करत आहेत. अशातच हिंदू महासभेच्या एका नेत्याने अजब वक्तव्य केले आहे.

हिंदू महासभेचे अध्यक्ष चक्रपाणी यांनी म्हंटले कि, कोरोनाच्या रूपाने भगवान नृसिंहने अवतार घेतला आहे. हा अवतार मांसाहार करणाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी घेतला आहे. प्राण्यांना मारण्यापासून रोखण्यासाठी आणि मासांहारींना शाकाहारींमध्ये बदलण्यासाठी नृसिंह त्यांना धडा शिकवण्यासाठी आले आहेत. कोणत्याही व्यक्तीने मांसाहार केल्यास शिक्षा म्हणून त्याला कोरोनाची बाधा होत आहे, असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले आहे.

एवढेच नव्हेतर कोरोनापासून वाचण्यासाठी चक्रपाणी यांनी चीनला एक उपायही सांगितला आहे. ते म्हणाले कि, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी कोरोनाची एका मूर्ती बनवावी आणि त्या मूर्तीसमोर क्षमायाचना करावी. तसेच मूर्तीसमोर चिनी नागरिकांनी कधीही मांसाहार करणार नसल्याची आणि प्राण्यांना मारणार नाही, अशी शपथ घ्यावी. यानंतर कोरोनाचा प्रकोप थांबेल, असे त्यांनी सांगितले आहे.

चक्रपाणी पुढे म्हणाले कि, भारताचे नागरिक देवाची पूजा करतात आणि गोरक्षा करण्यात विश्वास ठेवतात म्हणून त्यांच्यामध्ये कोरोनासोबत लढण्याची ताकद आहे.

दरम्यान, याआधीही चक्रपाणी यांनी वादग्रस्त वक्तव्ये केली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.