पंतप्रधान मोदींना रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार जाहीर

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रशियाने सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवान्वित करणार असल्याचे जाहीर केले आहे. भारतातील रशियन दूतावासानं यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, रशियातील सर्वोच्च अशा ‘ऑर्डर ऑफ सेंट अँड्रू द अपोसल पदका’नं मोदींचा गौरव करण्यात येणार आहे.

रशिया आणि भारत यांच्यातील संबंध वेगळ्या उंचीवर नेल्याबद्दल मोदींना हा पुरस्कार देण्यात येईल. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांनी याबाबतच्या आदेशावर सही केली आहे.

हा रशियाचा सर्वाच्च पुरस्कार मानला जातो. रशियाकडून दिला जाणाऱ्या या सन्मानाला मोठा इतिहास आहे. 17 व्या शतकापासून हा पुरस्कार दिला जातो. याआधी काही महिन्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सौदी अरेबियाने सौदीचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘द किंग अब्दुलअझीज साश’ देऊन गौरव केला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.