नरेंद्र मोदी यांचा ‘शपथविधी’चा मुहूर्त ठरला ?

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीचे सर्व जागांवरील कल हाती येत आहेत. या निकालात भाजपसह मित्र पक्षांनी मोठी मुसंडी मारली आहे. मागील 2014 च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला अधिक जागा मिळाल्या आहेत. भाजप जवळपास 340 जागांचा टप्पा ओलांडला आहे. भाजप आणि मित्रपक्षांनी सलग दुसऱ्या टर्ममध्ये आधीपेक्षा अधिक जागा मिळवणारा भाजप पक्ष आणि नरेंद्र मोदी पहिले पंतप्रधान ठरले आहेत. अशातच मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा 30 मे रोजी पार पडण्याची शक्यता आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पंतप्रधान पदावर पुन्हा एकदा मोदींच्या नावाची मोहर उठली आहे. मोदींचा शपथविधी गुरुवारी, 30 मे रोजी पार पडणार अशी चर्चा आहे. 2014 मध्ये मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाले त्यावेळी अत्यंत भव्य समारंभ करण्यात आला होता. तसेच या कार्यक्रमासाठी ‘सार्क’ मधीलच्या देशांच्या प्रमुखांना आमंत्रण देण्यात आले होते. ज्यामध्ये पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांचा देखील समावेश होता. त्यामुळे यंदा होणाऱ्या शपथविधी सोहळ्याची उत्सुकता साऱ्यांनाच लागली असून या सोहळ्यात कोणकोण सहभागी होणार अशी चर्चा सुरू आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.