Narendra Modi | Akhilesh Yadav – देशात पुन्हा सत्तेवर येत असलेले मोदी सरकार दोलायमान स्थिती असून ते अडचणीत सापडणार आहे, असे भाकित सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी केले आहे.
‘एक्स’ वरील एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, “ऊपर से कोई तार नहीं, नीचे कोई आधार नहीं. आधार में जो लटकी हुई वो तो कोई ‘सरकार’ नाही” याचा अर्थ असा होतो की नवीन सरकारचे भवितव्य दोलायमान आहे.
ऊपर से जुड़ा कोई तार नहीं, नीचे कोई आधार नहीं
अधर में जो है अटकी हुई वो तो कोई ‘सरकार’ नहीं— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) June 9, 2024
मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार असले तरी त्यांनी स्वबळावरचे बहुमत गमावले असून त्यांना चंद्राबाबू नायडू आणि नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील पक्षांचा आधार घ्यावा लागणार आहे.
यावेळच्या निवडणुकीत अखिलेश यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पक्षाला उत्तरप्रदेशात भाजप पेक्षा अधिक जागा मिळाल्या आहेत. त्यांच्या पक्षाच्या समावेश असलेल्या इंडिया आघाडीने उत्तरप्रदेशात ८० पैकी ४३ जागा जिंकल्या आहेत. एकट्या समाजवादी पक्षाला ३७ जागा मिळाल्या आहेत.