राफेल बाबत धक्कादायक माहिती आली समोर ; मोदींनी थेट फ्रान्सशी केल्या वाटाघाटी

नवी दिल्ली: राफेल मुद्द्यावरून आज लोकसभेत चांगलाच गदारोळ झाला. विरोधकांनी एकजूट होत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच वृत्तपत्रातील राफेलबाबतच्या बातमीचा पुरावा देत संयुक्त संसदीय समित (जेपीसी) कडून चौकशी करण्याची मागणी केली.

द हिंदूने दिलेल्या वृत्तानुसार पंतप्रधान मोदींनी थेट फ्रान्सशी वाटाघाटी केल्यानं संरक्षण मंत्रालयाची बाजू कमजोर ठरली असल्याचे म्हटले आहे, त्यामुळे राहुल गांधी यांनी सुद्धा नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. राफेल करारातीत नरेंद्र मोदींच्या भूमिकावरुन चौकीदारचं चोर आहे, हे सिद्ध झालं आहे. राफेल कराराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण दोघेही खोटं बोलत आहेत. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात खोटी माहिती दिल्याने कोर्टाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित होत आहेत, अंसही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

7.87 बिलियन डॉलरच्या वादग्रस्त राफेल करारावर दोन्ही देशांकडून वरिष्ठ स्तरावर चर्चा सुरु होती. परंतु पंतप्रधान कार्यालयाने या करारात समांतर हस्तक्षेप करुन थेट वाटाघाटी केली. संरक्षण मंत्रालयाने समांतर हस्तक्षेपाचा जोरदार विरोध केला होता. या हस्तक्षेपामुळे संरक्षण मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाच्या टीमची करारासंदर्भातील बातचीत कमकुवत पडली. याचा फायदा फ्रान्सला मिळाला. त्यांनतर २४ नोव्हेंबर २०१५ रोजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निदर्शनास आणले असल्याचे ‘द हिंदू’ने म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.