नवी दिल्ली : भारत सर्वात मोठा लोकशाही देश आहे. भारताच्या लोकशाहीची मुळे आपल्या हजारो वर्षांच्या इतिहासाने जोपासली गेली आहेत. मात्र, लंडनमध्ये याच भारताच्या लोकशाहीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं हे दुर्दैवी आहे, असे म्हणत पंतप्रधान मोदी यांनी राहुल गांधी यांच्या लंडनमधील भाषणावर टीका केली होती. दरम्यान, मोदी यांच्या टीकेला काँग्रेस नेते पवन खेरा यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. ”नरेंद्र मोदीजी तुम्ही केवळ पंतप्रधान आहात, देव नाही”, असं ते म्हणाले. त्यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली.
याविषयी पवन खेरा यांनी केलेल्या ट्विटमध्ये, ‘पंतप्रधान मोदी जेव्हा म्हणतात, की काँग्रेसने ७० वर्षात काहीच केलं नाही, तेव्हा ते तीन पिढ्यांचा अपमान करता. बीबीसीवर छापे टाकताना त्यांना देशाच्या प्रतिमेची काळजी नव्हती. दक्षिण कोरियात बोलताना, ‘भारतात जन्म घेणं दुर्देवी आहे’, असे ते म्हणाले होते. तेव्हा त्यांना भारताच्या लोकशाही बद्दल आदर नव्हता का? अशी प्रतिक्रिया पवन खेरा यांनी दिली. तसेच पंतप्रधान मोदी यांना स्वत:बद्दल काही गैरसमज आहेत. ते स्वत:ला देव समजतात, पण त्यांनी हे लक्षात ठेवावं, की ते फक्त या देशाचे पंतप्रधान आहेत, देव नाहीत, असेही ते म्हणाले.
प्रधानमंत्री जी… अगर आप बबूल बोएंगे तो आम नहीं मिलेगा।
जब आप विदेश में कह रहे थे कि भारत में पैदा होना ही एक दुर्भाग्य है, तब भी विश्व सुन रहा था और आप हंस रहे थे।
प्रधानमंत्री जी, लोकतंत्र पर हमले आप करते हैं।
: @Pawankhera जीpic.twitter.com/xb3FRaYjN2
— Congress (@INCIndia) March 12, 2023
केंब्रिजमधील विद्यार्थ्यांसमोर भारतीय लोकशाहीसमोरील आव्हानांवर चर्चा केली, तर त्यात चुकीचं काय? तुमच्या धोरणांवर केलेली टीका, ही देशावर केलेली टीका कधीपासून व्हायला लागली? असा प्रश्नही त्यांनी विचारला.
धारवाड येथील ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या (आयआयटी) संकुलाचे उद्घाटन केल्यानंतर एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी राहुल गांधी यांच्या अप्रत्यक्ष टीका केली होती. “ज्या लंडनमध्ये बसवेश्वरांचा पुतळा आहे, त्याच लंडनमध्ये भारताच्या लोकशाहीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जाणे अत्यंत दुर्दैवी आहे.असे म्हटले होते. त्यांच्या याच टीकेचा काँग्रेसने समाचार घेतला अशे.