Narendra Modi Video: ‘पेपर माफियांना आता सोडणार नाही’; विधेयक मंजूर होताच PM मोदींचा सेल्फी व्हिडिओ, पहा video
Narendra Modi Video: संसदेच्या दोन्ही सभागृहांनी पेपरफुटी विरोधी कायद्याशी संबंधित एक महत्त्वपूर्ण विधेयक काल मंजूर केले.

Narendra Modi Video: संसदेच्या दोन्ही सभागृहांनी पेपरफुटी विरोधी कायद्याशी संबंधित एक महत्त्वपूर्ण विधेयक काल मंजूर केले. या संदर्भात, पंतप्रधान मोदींनी रात्री उशिरा त्यांच्या खास शैलीत एक इन्स्टाग्राम व्हिडिओ संदेश जारी केला.
आपल्या नव्या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले की, प्रत्येक राज्य पेपरफुटीच्या समस्येने त्रस्त आहे. पेपरफुटी करणाऱ्या टोळ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. दोन्ही सभागृहांनी कठोर कायदे आणि तरतुदी असलेले विधेयक मंजूर केले आहे. संसदेने एक असे विधेयक मंजूर केले आहे, जे आपल्या परीक्षा प्रणालीला अधिक मजबूत करते. (Narendra Modi Video)
पंतप्रधान मोदी म्हणाले, “मित्रांनो, एक विश्वसनीय परीक्षा प्रणाली सुनिश्चित करण्यासाठी आम्ही एकामागून एक पावले उचलत आहोत. आपल्याला एक कार्यदल (टास्क फोर्स), एक जलदगती प्रणाली (फास्ट-ट्रॅक सिस्टीम) तयार करण्याची गरज आहे आणि राज्यांनी सूचनांचा विचार केला पाहिजे. गेल्या अनेक दशकांपासून प्रत्येक राज्य आणि केंद्र सरकारला अशा पेपरफुटीच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. यामुळे मुलांच्या भविष्याबद्दल चिंता निर्माण होत आहे.”
Parliament passes a Bill that makes our examination system more robust! pic.twitter.com/OEvLKXoUaf
— Narendra Modi (@narendramodi) July 30, 2026
पंतप्रधान मोदी म्हणाले, “हे सर्व लक्षात घेता, देशभरातील शिक्षण प्रणालीत, सर्व राज्यांमध्ये आणि केंद्र स्तरावर सुधारणा करणे अत्यावश्यक झाले आहे. तंत्रज्ञानाचा पूर्ण वापर करणे आवश्यक आहे.” पेपर माफिया, पेपरफुटी करणारी टोळी आणि देशाच्या मुलांच्या भविष्याशी खेळणाऱ्या टोळीला सोडले जाणार नाही. (Narendra Modi Video)
पंतप्रधान मोदी म्हणाले, “यासाठी कठोर कायद्यांचीही गरज आहे. आम्ही संसदेत एक विधेयक आणले होते आणि मी तुम्हाला वचन दिल्याप्रमाणे, आज दोन्ही सभागृहांनी कडक तरतुदींसह हे विधेयक मंजूर केले आहे. आता, एका विश्वासार्ह परीक्षा प्रणालीच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले गेले आहे.” (Narendra Modi Video)
ते म्हणाले, “हे काम सुरूच राहील. आम्ही अशी परिस्थिती जास्त काळ टिकू देणार नाही. याच आत्मविश्वासाने, विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण सर्वजण खांद्याला खांदा लावून एकत्र काम करूया.”





