नवी दिल्ली – देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत ‘राजीव गांधी’ यांची आज 28 वी पुण्यतिथी आहे. यानिमित्ताने पंतप्रधान ‘नरेंद्र मोदी’ यांनीदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून राजीव गांधी यांनी आदरांजली वाहिली आहे. मोदींनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून या संदर्भात ट्विट केलं आहे.
Tributes to former PM Shri Rajiv Gandhi on his death anniversary.
— Narendra Modi (@narendramodi) May 21, 2019
राजीव गांधी यांनी देशाच्या विकासाठी मोठे योगदान दिले आहे. 21 मे 1991 रोजी तामिळनाडूतील श्रीपेरुंबुदूर येथे घडवून आणलेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटात राजीव गांधी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.