नरेंद्र मोदी आईचे आशीर्वाद घेण्यासाठी उद्या गुजरातला जाणार

नवी दिल्ली- नरेंद्र मोदी निवडणूक लढवत असलेल्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणून आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीत स्वत:चाच विक्रम मोडला. या विजयनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या आईचे आशीर्वाद घेण्यासाठी उद्या गुजरातला जाणार आहेत.त्यानंतर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भरुभरुन मते देणाऱ्या वाराणसीच्या जनतेचे आभार मानण्यासाठी परवा काशीला जाणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी याबाबत ट्विट केले की, ‘आईचे आशीर्वाद घेण्यासाठी उद्या संध्याकाळी गुजरातला जाणार आहे. त्यानंतर माझ्यावर पुन्हा विश्वास ठेवणाऱ्या मतदारांचे आभार मानण्यासाठी परवा सकाळी काशीला जाणार आहे.’तत्पूर्वी या निकालात भाजपसह मित्र पक्षांनी मोठी मुसंडी मारली आहे.पंतप्रधान पदावर पुन्हा एकदा मोदींच्या नावाची मोहर उठली आहे. मोदींचा शपथविधी गुरुवारी, 30 मे रोजी पार पडणार अशी चर्चा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)