नवी दिल्ली : अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम अनेक प्रकारे विशेष आहे. गेल्या वर्षीच नूतनीकरणानंतर अहमदाबादमधील मोटेरा क्रिकेट स्टेडियमचे नाव यावर्षीच्या सुरुवातीला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने म्हणजेच ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ असे ठेवले गेले.
सध्या हे जगातील सर्वात मोठे स्टेडियम आहे. त्याची आसन क्षमता 1 लाख 32 हजार इतकी आहे. जगातील सर्वात मोठे स्टेडियम असल्याचा अभिमान बाळगून आता या स्टेडियमचे नाव लवकरच आणखी एक अभिमानास्पद क्षण जोडणार आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम लवकरच भारतीय क्रिकेटच्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार आहे.
* भारतीय क्रिकेटचा 1000 वा एकदिवसीय सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल
1000 सामने खेळणे हे कोणत्याही संघासाठी गौरवास्पद आहे आणि भारतीय पुरुष क्रिकेट संघ लवकरच हा पराक्रम गाजवणार आहे. 6 फेब्रुवारी 2022 रोजी भारतीय पुरुष क्रिकेट संघ आपला 1000 वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना वेस्ट इंडिजविरुद्ध खेळेल. हा ऐतिहासिक सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल.
* भारतीय क्रिकेट संघ 1000 एकदिवसीय सामने खेळणारा पहिला संघ बनणार
सध्या भारतीय पुरुष क्रिकेट संघ 996 एकदिवसीय सामने खेळला आहे. भारतीय संघ 6 फेब्रुवारीला नरेंद्र मोदी स्टेडियमवर 1000 एकदिवसीय सामने खेळणारा जगातील पहिला संघ बनेल जो आपल्यासाठी अत्यंत अभिमानास्पद क्षण असेल. 958 एकदिवसीय सामन्यांसह ऑस्ट्रेलिया सध्या भारतानंतर दुसऱ्या स्थानावर आहे.