मुंबई – बॉलिवूड अभिनेता ‘कार्तिक आर्यन’ने दोन दिवसांपूर्वी कोरोना व्हायरस संदर्भात एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला होता. ‘लोकांनी कोरोनाचे गांभीर्य ओळखून घरातून बाहेर पडू नये’ असं यात सांगण्यात आले होते. कार्तिकचा हा व्हिडीओ काही तासातच सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.
दरम्यान, आज (दि. २१) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील कार्तिकच्या या व्हिडिओचे कौतूक केले आहे. नरेंद्र मोदी यांनी कार्तिकचा हा व्हिडीओ आपल्या ऑफिशिअल ट्विटर हँडलवर शेअर केला आहे.
The young actors have something to say..
Its time to be ‘Zyada Savdhan’ and do ‘Corona ka Punchnama’! #IndiaFightsCorona https://t.co/drEZc4ySZMhttps://t.co/KbQaDg7a5Nhttps://t.co/1RjvF70jJlhttps://t.co/nwIES94SDD
— Narendra Modi (@narendramodi) March 20, 2020
मोदींनी लिहिले की, ‘या तरुण अभिनेत्याला तुम्हाला काही तरी सांगायचे आहे. हा जी वेळ आणि काळ सांगतोय तो जास्त सावधगिरी बाळगण्याची आहे आणि कोरोनाचा बिमोड करण्याची आहे.’ असं मोदी ट्विटमध्ये म्हणाले आहेत.
#CoronaStopKaroNa
My Appeal in my Style
Social Distancing is the only solution, yet ??@narendramodi we are with you Sir !! pic.twitter.com/qhQBZSdFAd— Kartik Aaryan (@TheAaryanKartik) March 19, 2020
कार्तिक आर्यनने आपल्या ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटात सलग 5 मिनिटे एक डायलॉग बोलून दाखवला होता. कार्तिकने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्याने कोरोना संदर्भात लोकांना सलग अडीच मिनिटे संदेश दिला आहे.