नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यासाठी सज्ज; शपथविधीआधीच वेळापत्रक तयार

नवी दिल्ली: लोकसभा निवडणूकीत भारतीय जनता पक्षाने बहुमत मिळवत सत्ता स्थापन करण्यासाठी तयारी सुरु केली आहे. येत्या 30 मे रोजी नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. शपथविधीनंतर मोदी पुन्हा एकदा परदेश दौऱ्यांसाठी सज्ज झाले असून दौऱ्याचे वेळापत्रक सुद्धा तयार आहे.

नरेंद्र मोदी १४,१५ जून दरम्यान शांघाय सहकार संघटनेच्या किर्गिस्तान येथे होणाऱ्या शिखर परिषदेला जाणार आहेत. या बैठकीला पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सुद्धा असणार आहेत. तसेच नरेंद्र मोदी जपानमधील ओसाको येथे होणाऱ्या जी२० शिखर परिषदेला २८,२९ जून दरम्यान जाणार आहेत. या परिषदेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, जपानचे पंतप्रधान शिंजो आबे व जगभरातील इतर नेते उपस्थित राहणार आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.