नरेंद्र मोदींनी केले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कौतुक

नवी दिल्ली: महाराष्ट्रात सरकार स्थापनेची गदारोळ अद्याप सुरू आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेने किमान सामान कार्यक्रम केला पण पुन्हा एकदा त्याला ग्रहण लागल्यासारखे दिसत आहे. दरम्यान, संसदेच्या हिवाळी अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कौतुक केले.

संसदेत निषेधासाठी वेलमध्ये येऊन घोषणा देणाऱ्या सदस्यांच्या प्रवृत्तीकडे लक्ष वेधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपसह सर्व राजकीय पक्षांना बिजू जनता दल (बीजेडी) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस कडून शिकण्यास सांगितले. आणि ‘वेलमध्ये न येताही राजकीय विकास होऊ शकतो’, असे सांगितले.

राज्यसभेच्या २५०व्या अधिवेशनाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी ‘भारतीय राजकारणातील राज्यसभेची भूमिका … पुढे जाण्याचा मार्ग’ या विषयावरील विशेष चर्चेत भाग घेतला. ते म्हणाले,  राष्ट्रवादी कॉंग्रेस व बीजेडीने स्वत:च निर्णय घेतला आहे कि ते वेलमध्ये येणार नाहीत. या दोन्ही पक्षांचे कौतुक करताना पंतप्रधान म्हणाले, राष्ट्रवादी व बीजेडी सदस्य त्यांच्या जागेपुढे येत नाहीत. दोन्ही पक्षांनी स्वत:हून निर्णय घेतला आहे की आपले सभासद वेलमध्ये जाणार नाहीत. त्यांच्या सदस्यांनीही हा नियम पाळला आहे.

नरेंद्र मोदी म्हणाले, वेलमध्ये आल्यामुळे पक्षांचा राजकीय विकास थांबला असे नाही. जेव्हा भाजप विरोधात होता तेव्हा आमचे सदस्यही असे करायचे. त्यांनी राष्ट्रवादी आणि बीजदचे उदाहरण देताना सांगितले की, ‘माझ्या पक्षाने आणि अन्य पक्षांनीही यातून शिकले पाहिजे.’

Leave A Reply

Your email address will not be published.