बेंजामीन नेतान्याहू यांच्या प्रचार पोस्टरवर नरेंद्र मोदी

तेल अविव – भारतात दुसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीचे सरकार आले आणि प्रथमच देशात सलग दोन वेळा बिगर कॉंग्रेसी सरकार सत्तेवर आले आहे. हा करिष्मा केवळ नरेंद्र मोदींचा आहे हे सर्वच पक्ष मान्य करतात. मात्र, आता इस्त्रायलमध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी नरेंद्र मोदींच्या फोटोचा वापर केला जातो आहे. नेतान्याहू आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एक पोस्टर सध्या इस्रायलमध्ये चर्चेचा विषय ठरले आहे. त्या पोस्टरचा फोटो भारतातही व्हायरल होऊ लागला आहे.

जामिन नेतान्याहू आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तांदोलनाचे पोस्टर इस्रायलमध्ये एका इमारतीवर लावण्यात आले आहे. एक पत्रकार अमिचाई स्टेईन याने रविवारी ते शेअर केले आहे. विशेष म्हणजे यापूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचेही असेच एक पोस्टर त्याच इमारतीवर यापूर्वी झळकले होते. स्टेईन याने आपल्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे की, नेतान्याहूू यांच्या निवडणूक प्रचाराची जाहिरात.

पुतीन, ट्रम्प आणि मोदी. इस्रायलमध्ये सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारासाठी 17 सप्टेंबर रोजी मतदान होत आहे. या इमारतीवरील पोस्टर्सच्या माध्यमातून नेतान्याहू यांचे जगभरातील बड्या नेत्यांशी कसे सलोख्याचे संबंध आहेत आणि त्या माध्यमातून ते इस्रायलला जागतिक पातळीवर कसे पुढे घेऊन जात आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. या निवडणुकीचा प्रचार देखील सुरू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)