नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नरेंद्र मोदी यांना दिलेल्या समर्थनावरून घेरत, पाकिस्तानला नरेंद्र मोदी यांच्या शिवाय चांगला पंतप्रधान मिळू शकत नाही, असे अरविंद केजरीवाल म्हणाले. पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्यावर प्रश्न उपस्थित करत, हा हल्ला नेमका निवडणुकीच्याच तोंडावर कसा काय झाला ? असा प्रश्न देखील अरविंद केजरीवाल यांनी उपस्थित केला. त्यामुळे नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यात काहीतरी काळंबेरं असल्याचा आरोप करत मोदी हे पाकिस्तानचा अजेंडा राबवत असल्याचे ते म्हणाले.
काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी, भारतातील आगामी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी निवडून आल्यास भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाद मिटतील असे म्हंटले होते.