नरेंद्र मोदी यांच्या वाराणसीतील रोड शो ला सुरवात

वाराणसी – बनारस विश्व हिंदू विद्यालयाच्या येथील बीएचयूचे संस्थापक पंडित मदन मोहन मालवीय यांच्या पुतळ्याला अभिवादन करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या वाराणसीतील रोड शो ला प्रारंभ केला आहे. वाराणसीमधील लंका परिसरातून सुरु होणारा हा रोड शो दशाश्वमेध घाटापर्यंत जाणार आहे.

उद्या म्हणजेच शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी बाबा विश्वनाथ यांचे दर्शन घेऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर काँग्रेसने आज नरेंद्र मोदींविरोधात अजय राय यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

वाराणसी मतदारसंघातील २०१४ ची निवडणूक रंगतदार ठरली होती. कारण भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद मोदी हे येथून निवडणुकीच्या रिंगणात होते. तर दुसरीकडे त्यांना आव्हान देण्यासाठी आपचे अरविंद केजरीवाल हे दिल्लीवरुन वाराणसी येथे आले होते. मोदींनी केजरीवाल यांचा ३ लाखांहून अधिक मतांनी पराभव केला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.