नवी दिल्ली – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मला कानशिलात देऊ इच्छितात. परंतु, तुम्ही दिलेली कानशिलातही माझ्यासाठी आशीर्वादच असेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हंटले आहे. नरेंद्र मोदींना आपण पंतप्रधान मानत असून त्यांच्या कानशिलात लागवावी वाटते, असे वक्तव्य ममता बॅनर्जी यांनी काही दिवसांपूर्वीच केले होते. या वादग्रस्त वक्तव्याचा मोदींनी आज समाचार घेतला.
नरेंद्र मोदी म्हणाले कि, तुमची कानशिलातही माझ्यासाठी आशीर्वाद आहे. परंतु, हीच कानशिलात तुम्ही तुमच्या साथीदारांना देण्याची हिम्मत दाखवली असती तर चिटफंड घोटाळा झाला नसता. माँ, माटी आणि मानुषी यांच्या गोष्टी करून सत्तेत आलेल्या ममता बॅनर्जींना जनतेशी काही देणेघेणे राहिलेले नाही. ममता बॅनर्जींनी सत्तेच्या नशेत पहिले पश्चिम बंगलला बर्बाद केले. आणि आता सत्ता जाण्याच्या भीतीने उद्ध्वस्त करत आहेत, अशी टीका त्यांनी केली.
PM Narendra Modi addressing a public rally in Bankura, #WestBengal: Mamata Didi ne pehle Bengal ko barbaad kiya apni satta ke nashe mein, ab woh Bengal ko aur tabah karne par tul gayi hai apni satta jaane ke darr se pic.twitter.com/YWoWNHiLH9
— ANI (@ANI) May 9, 2019
ते पुढे म्हणाले, दीदी मला पंतप्रधान मानण्यासाठी तयार नाहीत. परंतु, पाकिस्तानच्या पंतप्रधान मानण्यात त्यांना गौरव वाटतो. ममता बॅनर्जी मला पंतप्रधान न मानून संविधानाचा अपमान करत आहेत, असा आरोपदेखील त्यांनी केला आहे.
PM Narendra Modi addressing a public rally in Bankura, #WestBengal:Didi desh ke samvidhaan ka apmaan kar rahi hain. Woh keh rahi hain ki desh ke pradhan mantri ko pradhan mantri maanne ke liye tayar nahi hain lekin unko Pakistan ke PM ko PM maanne mein gaurav ka anubhaav hota hai pic.twitter.com/fMlyXuAQWl
— ANI (@ANI) May 9, 2019