नवी दिल्ली – माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांना श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे त्यावरील उपचाराकरीता दिल्लीतील एम्स (अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार अरूण जेटली यांना शुक्रवारी सकाळी 11 वाजता नियमित तपासणीकरिता रूग्णलयात आणले होते.
जेटली यांना श्वास घेताना त्रास होत असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. मात्र, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. सांयकाळी अरूण जेटली यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी एम्स रुग्णालयात पोहोचले. त्यापूर्वी अरुण जेटली यांना भेटण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, डॉ. हर्षवर्धन एम्समध्ये पोहोचले होते.
Delhi: Prime Minister Narendra Modi arrives at All India Institute of Medical Sciences (AIIMS) where Former Finance Minister Arun Jaitley has been admitted pic.twitter.com/nW91PEEl25
— ANI (@ANI) August 9, 2019
दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून अरूण जेटलींची तब्येत खराब असल्याने, त्यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील कॅबिनेट मंत्रिमंडळात सहभागी होण्यास नकार दिला होता.